केंद्रसंचालकांसह दोघांवर कारवाईचे आदेश

केंद्रसंचालकांसह दोघांवर कारवाईचे आदेश
Published on

दहावी परीक्षा गैरप्रकार;
दोघांवर कारवाईचे आदेश

आणखी १५ शिक्षक चौकशीच्या फेऱ्यात

सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. ८ : फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेतील गैरप्रकार प्रकरणी वावी येथील परीक्षा केंद्राच्या केंद्रसंचालक व उप केंद्रसंचालकांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीत एका विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेतील हस्ताक्षरात बदल झाल्याचे आढळून आल्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका शिक्षण मंडळाने ठेवला आहे. या प्रकरणात आणखी सुमारे १५ शिक्षक व कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू असून त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील वावी येथील नूतन विद्यालयातील केंद्र क्रमांक १५७० येथे हा गैरप्रकार घडल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते गणेश वेलजाळी यांनी जून २०२६ मध्ये शिक्षण मंडळाकडे केली होती. या तक्रारीनंतर प्रकरणाची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान एका विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेतील हस्ताक्षरात बदल झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी केंद्रसंचालक दिलीप बाजीराव रानडे व उप केंद्रसंचालक चंद्रकांत दिलीप ढेपले यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याचे शिक्षण मंडळाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी नियम, १९८१ नुसार या दोन्ही शिक्षकांवर संबंधित संस्थांनी प्रशासकीय कारवाई करून त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिव सरोज जगताप यांनी दिले आहेत. याबाबतचे आदेश संबंधित शिक्षण संस्थांनाही पाठविण्यात आले आहेत.

प्रमाणपत्र जमा करण्याच्या सूचना
चौकशीदरम्यान उत्तरपत्रिकेतील हस्ताक्षरात बदल आढळलेल्या विद्यार्थ्याकडून दहावीचे प्रमाणपत्र जमा करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. यासंदर्भातील आदेश संबंधित शिक्षण संस्थेलाही बजावले आहेत. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्याच्या अकरावीच्या प्रवेशाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com