निर्भयपणे परीक्षा द्या : रंजन तावरे
माळेगाव, ता. २० : ‘‘दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असून भीती आणि दडपण न घेता आत्मविश्वासाने सर्व पेपर सोडवून यश संपादन करावे,’’ असे आवाहन माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी केले.
माळेगाव (ता. बारामती) येथील श्रीमंत शंभुसिंह महाराज हायस्कूल येथे दहावीच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यावेळी रंजन तावरे बोलत होते. याप्रसंगी साहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास साळवे, विश्वास भोसले, दत्तात्रेय तावरे, योगेश भोसले, अजित आत्तार, ऋषीकेश बनसोडे यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
माळेगाव केंद्रावर नवमहाराष्ट्र विद्यालय पणदरे तसेच इंग्लिश मीडियम स्कूलसह विविध शाळांतील सुमारे ३५० विद्यार्थी परीक्षा देत आहेत. प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून हे केंद्र कॉपीमुक्त ठेवले आहे. विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची तसेच आरोग्य सुविधांची व्यवस्था केल्याची माहिती परीक्षा केंद्र प्रमुख तथा प्राचार्य दत्तात्रेय माने यांनी दिली. निरंजन शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रदर्शन प्रकाश धुमाळ यांनी आभार मानले.
डिजिटल पेटीचा अभिनव उपक्रम
पेपरफुटीला आळा घालण्यासाठी डिजिटल पेटीचा वापर माळेगावात करण्यात आला. पेपर फुटू नयेत यासाठी परीक्षा मंडळाने डिजिटल पेटीचा अभिनव उपक्रम राबविला. विशिष्ट कोडद्वारे ही पेटी उघडली जात असून त्यामुळे पेपरफुटीचा धोका टळला आहे. या उपक्रमाचे विद्यार्थी व पालकांनी स्वागत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

