शिनोली केंद्रावर प्रभावी कॉपीमुक्त अभियानाची राबवणूक

शिनोली केंद्रावर प्रभावी कॉपीमुक्त अभियानाची राबवणूक

Published on

फुलवडे, ता. २० ः शिनोली (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात आज दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे उपस्थितांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष मधुकर बोऱ्हाडे, टी. एस. बोऱ्हाडे, पतसंस्थेचे सचिव गणेश सोमवंशी, शिनोली बोर्डाचे केंद्र संचालक अजित अभंग, जिल्हा परिषद मॉडेल स्कूल शाळा समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोऱ्हाडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परीक्षा केंद्र परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवले जात असल्याचे केंद्र संचालक अभंग यांनी सांगितले.
या केंद्रावर परीक्षेसाठी श्री हनुमान विद्यालय गंगापूर, श्री एन. एम. नंदकर अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा फुलवडे, न्यू इंग्लिश स्कूल बोरघर, शरदचंद्रजी पवार विद्यालय डिंभे, कृष्णा यशवंत भालचिम विद्यालय माळीण, सहकार महर्षी गोविंदराव वळसे पाटील विद्यालय असाणे या सात शाळांचे २०७ विद्यार्थी परीक्षेसाठी येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com