11 cyclists from the Fursungi Cyclist Group reached Jagannath Puri after completing a ‘cycle pilgrimage’ (cycle-wari).
sakal
लोणी काळभोर - जिद्द, चिकाटी आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हवेली तालुक्यातील फुरसुंगी सायकलिस्ट ग्रुपच्या ११ सायकलवीरांनी फुरसुंगी ते जगन्नाथ पुरी (ओडिशा) असा तब्बल १ हजार ६०० किलोमीटरचा प्रवास अवघ्या सात दिवसांत पूर्ण केला. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा अशा चार राज्यांतून दररोज सरासरी २५० किलोमीटर अंतर पार करत सायकलस्वारांनी जगन्नाथ मंदिरात पोहोचून आपल्या मोहिमेची यशस्वी सांगता केली. त्यांच्या या साहसी ‘सायकलवारी’चे सर्वत्र कौतुक होत आहे.