
Latest Pune Police News: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचे विस्तारीकरण वाढत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे शहरात सात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये चार अशा ११ नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकण दौऱ्यादरम्यान सांगितले. त्यामुळे या नवीन पोलिस ठाण्यांमधून लवकरच प्रत्यक्षात कामकाज सुरू होण्याची शक्यता आहे.
पुणे पोलिस आयुक्तालयात समाविष्ट गावांचा समावेश झाला आहे. त्यामळे शहराचा विस्तार वाढत आहे. सध्या पुणे पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ३२ पोलिस ठाणी आहेत. शहराचा विस्तार लक्षात घेता कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती करणे गरजेचे आहे.