खुटबाव : दौंड येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. घरातीलच श्वानाने चिमुकल्याला चावल्याने मुलाचा जीव गेल्याची घटना घडली. नानगाव येथील ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गणेश खराडे यांचा ११ वर्षीय मुलगा शौर्य याला दोन महिन्यांपूर्वी पिसाळलेला कुत्रा चावला. मात्र ही बाब शौर्याने घरच्यांपासून लपवून ठेवल्यामुळे त्याचे रेबीज आजाराने निधन झाले.