Baramati News : बारामतीत 111 रक्तदात्यांनी केले रक्तदान; भगवान महावीर जन्मकल्याणकाचे औचित्य

भगवान महावीर जन्मकल्याणकाचे औचित्य साधत रविवारी (ता. 21) बारामतीत भारतीय जैन संघटनेच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन केले गेले.
Baramati News
Baramati Newssakal

बारामती : भगवान महावीर जन्मकल्याणकाचे औचित्य साधत रविवारी (ता. 21) बारामतीत भारतीय जैन संघटनेच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन केले गेले. शिबीराचे यंदाचे 36 वे वर्ष असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सम्यक छाजेड यांनी दिली. यंदा विक्रमी 111 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले. रक्तदातांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

शिबिराचे उद्घाटन श्री मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन देवस्थानचे अध्यक्ष किशोर शहा (सराफ), सम्यक छाजेड, महिला अध्यक्षा गीतांजली शहा, धवल शहा, आनंद छाजेड, मेहुल दोशी, गौरव कोठडीया, दिलीप दोशी, जयेंद्र मोदी, प्रवीण मुथा, भारत ललवाणी, विशाल वडुजकर, कुंदन टाटिया, विजय मंडलेचा, किशोर कोठारी यांच्या उपस्थितीत झाले.

रक्तदान शिबीरासाठी संघटनेचे उपाध्यक्ष विपुल वडूजकर, सचिव रमेश मुथा, खजिनदार राहुल शहा, नंदिता शहा, अर्चना सराफ, राखी छाजेड, बिजल दोशी, नयन गांधी, सिद्धार्थ गुगळे, आदित्य पंदारकर, आनंद टाटीया, प्रतीक पारख, हर्षल सुराणा, अजित बेदमुथा यांनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com