
पुणे/मार्केट यार्ड : ‘‘गेल्या ११२ वर्षांपासून श्री पूना गुजराती बंधू समाज संस्था सातत्याने पुण्याच्या समाज जीवनात एकरूप होऊन भरीव कार्य करत आहे. गुजराती समाज मुळात संघर्ष आणि वादविवादापासून दूर आहे. त्यामुळे तो देशात आणि बाहेरही सर्वत्र सहजपणे एकरूप होतो, तो सहज स्वीकारलाही जातो,’’ असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी केले.