पुणे जिल्ह्यात दिवसभरात ११६ कोरोना रुग्णांचा मृत्यू

गेल्या साडेतीन महिन्यांमधील कोरोनाबाधितांचे सर्वाधिक मृत्यू रविवारी
Death Corona Virus
Death Corona VirusGoogle
Updated on

पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या साडेतीन महिन्यांमधील कोरोनाबाधितांचे सर्वाधिक मृत्यू रविवारी झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. पुणे जिल्ह्यात झालेल्या ११६ पैकी ५३ मृत्यू पुणे शहरातील आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत झालेले हे कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू आहेत. पुण्यात डिसेंबरपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी झाली. त्या प्रमाणात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही झपाट्याने कमी झाले.

फेब्रुवारीमध्ये जिल्ह्यातील रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण दोन इतके कमी झाले होते. त्यानंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत गेली. त्यामुळे उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले. जिल्ह्यात गेल्या सलग चार दिवसांपासून शंभरहून कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.

corona outbreak summery report pune district total
corona outbreak summery report pune district totalpune zp

फेब्रुवारीतील मृत्यूचा आकडा

तारीख मृतांची संख्या

१ फेब्रुवारी ५

२ फेब्रुवारी ५

६ फेब्रुवारी २

७ फेब्रुवारी ५

८ फेब्रुवारी ५

१३ फेब्रुवारी ४

१४ फेब्रुवारी ४

१५ फेब्रुवारी २

२४ फेब्रुवारी ४

चार दिवसांमधील मृत्यू

तारीख मृतांची संख्या

१५ एप्रिल ११४

१६ एप्रिल १०९

१७ एप्रिल १००

१८ एप्रिल ११६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Illegal Drug Trade: Notorious Criminal Arrested for Selling Banned Injections in Hadapsar
Recruitment Drive: Government Approves 5,012 Assistant Professor Posts in Maharashtra
FYJC Admissions 2026: Over 12.49 Lakh Students Register for 11th Standard
Police Commissioner Amitesh Kumar
Marathi News Esakal
www.esakal.com