
पुणे : इयत्ता अकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेतील पहिल्या नियमित ‘कॅप’ फेरीतील निवड यादी गुरुवारी (ता. २६) जाहीर होणार आहे. या दिवशी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मिळालेल्या महाविद्यालयांची निवड यादी आणि पहिल्या फेरीचा कट-ऑफ जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे.