
पुणे : इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील चौथी नियमित फेरी बुधवारी घोषित करण्यात आली. या फेरीत एकूण ८३ हजार ९४४ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालय देण्यात आले. विद्यार्थ्यांना गुरुवार (ता. ३१) ते शनिवार (ता. २) दरम्यान महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे.