
पुणे : राज्यातील १४ लाख ५६ हजार ९३५ विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी नोंदणी केली. प्रवेश प्रक्रियेतील चार नियमित फेऱ्या आणि सर्वांसाठी खुली फेरी यातून आतापर्यंत नोंदणी केलेल्यांपैकी जवळपास ८२.६० टक्के म्हणजेच १२ लाख तीन हजार ४४२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. पुणे जिल्ह्यातून तीन लाख ८१ हजार १४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून आतापर्यंत एकूण एक लाख १६ हजार ६१४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.