देशातील 17 राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये नोकरीची संधी

Banking
Banking

भवानीनगर (पुणे) : देशातील 17 राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये लिपिकपदाच्या 12 हजार 75 जागांची भरती होणार आहे, त्यासाठी इंडियन बॅंकिंग पर्सनल सिलेक्‍शनच्या (आयबीपीएस) वतीने डिसेंबर 2019 ते जानेवारी 2020 मध्ये परीक्षा होणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 9 ऑक्‍टोबर 2019 आहे.

देशातील अलाहाबाद बॅंक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, आंध्र बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, कॅनरा बॅंक, इंडियन ओव्हरसिज बॅंक, सिंडिकेट बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स, युको बॅंक, कार्पोरेशन बॅंक, पंजाब नॅशनल बॅंक, युनियन बॅंक, इंडियन बॅंक, पंजाब अँड सिंध बॅंक, युनायटेड बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ इंडिया अशा 17 बॅंकांचा यामध्ये समावेश असून महाराष्ट्रातील 1203 जागांचा यामध्ये समावेश आहे.

या पदासाठी 1 सप्टेंबर 2019 रोजी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय किमान 20 व कमाल 28 वर्षे असावे. अनुसूचित जाती, जमातीसाठी पाच वर्षे, ओबीसीसाठी 3 वर्षे, माजी सैनिकांसाठी, विधवा, परित्यक्तांसाठी शासन नियमानुसार वयात सवलत आहे. या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ही शैक्षणिक अर्हता असून या भरतीच्या पूर्वपरीक्षेसाठी इंग्रजीकरिता 30 गुण, अंकगणित व आकलन क्षमता या विषयांसाठी प्रत्येकी 35 गुण अशी 100 गुणांची, तर मुख्य परीक्षा सामान्य व आर्थिक ज्ञानासाठी 50, इंग्रजी विषयासाठी 40, तर आकलन क्षमता व संगणकीय ज्ञानासाठी 60 गुण व ऍप्टिट्यूडसाठी 50 गुण अशी 200 गुणांची परीक्षा होणार आहे. बारामतीच्या राष्ट्रवादी करिअर ऍकॅडमीचे समीर मुलाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार अनुसूचित जाती, जमाती, माजी सैनिक, विधवा, अपंगांसाठी 100 रुपये, तर उर्वरित सर्वांसाठी 600 रुपयांचे परीक्षा शुल्क आहे. यातील अधिक व सविस्तर माहितीसाठी आयबीपीएसच्या www.ibps.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com