मॉस्कोत गारठले 120 विद्यार्थी; दूतावास, विमान कंपन्यांच्या वादाचा फटका 

मॉस्कोत गारठले 120 विद्यार्थी; दूतावास, विमान कंपन्यांच्या वादाचा फटका 

पुणे - रशियात वैद्यकीय शिक्षण घेत असलेले पुणे, मुंबई, कोल्हापूर परिसरातील सुमारे 120 विद्यार्थी भारतीय दूतावास आणि विमान कंपन्यांच्या वादात अडकले आहेत. दिवाळीनिमित्त घरी येण्यासाठी आतुर झालेले हे विद्यार्थी सध्या रशियातील वसतिगृहात गारठले आहेत. पैसे आणि खाद्यपदार्थही संपल्यामुळे त्यांच्यावर संकट आले आहे. त्यामुळे पालक हवालदिल झाले आहेत. याबाबत पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय मंत्र्यांशी संपर्क साधूनही मार्ग निघाला नाही. 

मास्कोजवळील कॉलीनग्रॉड शहरात एका महाविद्यालयात राज्यातील 120 विद्यार्थी वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेत आहेत. रशियात कोरोनाची दुसरी लाट येण्याची चिन्हे असल्यामुळे महाविद्यालयाने या विद्यार्थ्यांना परतण्यासाठी सांगितले. त्यानुसार 60 विद्यार्थ्यांनी 11 नोव्हेंबरसाठी मास्को ते दिल्ली प्रवासाची तिकिटे कतार एअरलाईन्सकडे आरक्षित केली. कॉलीनग्राडवरून दोन तास विमान प्रवास करून मॉस्कोला विद्यार्थी पोचले. चेक इन करताना कतार एअर लाईन्सने विद्यार्थ्यांकडे भारतीय दूतावासाचे "ना हरकत प्रमाणपत्र' नसल्यामुळे प्रवास करता येणार नाही, असे सांगितले. तिकिटासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 50 हजार रुपये खर्च केले होते. त्यातील फक्त आठ हजार रुपयांचा परतावा मिळेल, असे एअर लाईन्सकडून त्यांना सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी मॉस्कोतील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी "निक्‍स' कंपनीमार्फत खासगी विमानाची तिकिटे काढण्यास सांगितले. त्यासाठी पुन्हा प्रत्येकी किमान 42 हजार रुपये विद्यार्थ्यांना खर्च येणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मॉस्कोमध्ये सध्या उणे तापमान आहे. प्रचंड गारठ्यात रात्रभर विद्यार्थी विमानतळावरच होते. सांगलीतील "एकेईसी' एज्युकेशन कन्सलटंटमार्फत विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संबंधित संस्थेशी संपर्क साधला. त्या संस्थेने मॉस्कोतील विमानतळावरून विद्यार्थ्यांना कॉलीनग्राडमधील वसतिगृहात पोचविले. भारतात परतायचे म्हणून या विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांचा साठा केलेला नव्हता. त्यातच त्यांच्याकडील पैसेही संपल्यामुळे विद्यार्थी धास्तावले आहेत अन्‌ त्यांच्यावर ओढवलेल्या या परिस्थितीमुळे पालकही हवालदिल झाले आहेत. 

पंतप्रधानांना केले ट्‌विट 
विद्यार्थ्यांच्या पुण्यातील पालकांनी पालकमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, परराष्ट्र खाते, मास्कोतील भारतीय दूतावास यांना ट्‌विट केले. तसेच, विद्यार्थ्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ट्‌विट केले. परंतु, अद्याप त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

खाद्यपदार्थ पाठवायचे कसे? 
पुणे-मुंबईतून विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ पाठवायचे म्हटले तर रशियासाठी सध्या एअर पार्सल सेवा बंद आहे. त्यामुळे मुलांपर्यंत खाद्यपदार्थ पोचवायचे कसे, असा प्रश्‍न पालकांना पडला आहे. या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पिंपरी-चिंचवडमधील डेमोक्रॅटिक यूथ फाउंडेशन ऑफ इंडिया ही स्वयंसेवी संस्था प्रयत्न करीत आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दूतावासाने मदत करावी 
अफताब शेख या विद्यार्थ्याचा पिंपरी-चिंचवडमध्ये राहणारा भाऊ अमीन शेख म्हणाले, ""विद्यार्थ्यांकडील पैसे संपले आहेत. त्यांच्याकडे खाद्यपदार्थही नाहीत. त्यांची तेथे प्रचंड गैरसोय होत आहे. भारतीय दूतावासाने त्यांना तातडीने मदत केली पाहिजे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com