
वाघोली : माजी उपसरपंच राजेंद्र सातव यांनी नागरिकांना मोफत रेशनिंग कार्ड मिळावे यासाठी मोफत शिबिर घेतले. त्यात १२३३ नागरिकांनी आपली कागदपत्रे दिली. मात्र सहा महिने झाले तरी त्यांना रेशनिंग कार्ड मिळाले नाही. ज्या व्यक्तीने कार्ड देण्याची हमी घेतली होती तो आता टाळाटाळ करीत आहे. आपली फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त करून सातव यांनी हवेली तहसीलदार व वाघोली पोलिसांना तक्रार अर्ज दिला आहे.