Rajnath singh: २०४७ साली भारत बनेल महासत्ता, अर्थव्यवस्था असेल सर्वात मोठी ; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

‘कॉन्टॅक्टलेस वॉरफेअर’मुळे आधुनिक तंत्रज्ञानावर भर देण्याचे विद्यार्थ्यांना केले आवाहन
12th Convocation of DIAT Contactless Warfare India will largest economy by 2047 rajnath singh
12th Convocation of DIAT Contactless Warfare India will largest economy by 2047 rajnath singh sakal

पुणे : ‘‘संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरच्या दिशेने उचलण्यात येत असलेल्या पावलामुळे आज भारतात रायफलपासून ते ब्राह्मोस क्षेपणास्त्रांपर्यंत आणि हलक्या लढाऊ विमानापासून स्वदेशी जहाजापर्यंत सर्व काही निर्माण करण्यात येत आहे.

यामुळे लहान-मोठ्या अशा प्रत्येक तंत्रज्ञानात आपण पुढे येत आहोत. अशाच प्रकारे आपण आपल्या क्षमतांचा वापर केल्यास येत्या २०४७ पर्यंत भारत हा जगातील विकसित देश म्‍हणून उदयास येईल. तसेच अर्थव्यवस्थेत ही आपण पुढे असू, असे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्‍त केले.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) अंतर्गत येणाऱ्या खडकवासला येथील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (डीआयएटी) १२ व्या दीक्षान्त सोहळ्या दरम्यान ते बोलत होते. या प्रसंगी डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत, डीआयएटीचे कुलगुरू डॉ. सी.पी.रामनारायणन आदी उपस्थित होते.

यावेळी डीआयएटीच्या २८३ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. त्यातील २६१ विद्यार्थी हे एम.टेक आणि एम.एस्सी चे तर २२ पीएचडी विद्यार्थ्यांचा समावेश होता. तसेच २० विद्यार्थ्यांना यावेळी सिंह यांच्या हस्ते सुवर्ण पदकांने गौरविण्यात आले.

यावेळी सिंह म्हणाले, ‘‘संरक्षण उपकरणांच्या आयातीवरील अवलंबित्व हे देशाच्या धोरणात्मक स्वायत्ततेमध्ये अडथळा ठरू शकतो. या अनुषंगाने आत्मनिर्भरता मिळविण्याकरिता सरकारद्वारे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आत्मनिर्भरतेशिवाय आपण आपल्या राष्ट्रीय हिताच्या अनुषंगाने जागतिक समस्यांवर स्वतंत्र निर्णय घेऊ शकत नाही.

त्यामुळे संरक्षण क्षेत्रात आत्‍मनिर्भर होण्याबरोबरच आपल्या उत्पादनांच्या निर्यातीवर अधिक भर देण्याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. यामुळे केवळ आपली अर्थव्यवस्था मजबूत होणार नाही, तर रोजगाराच्या संधीही वाढतील. डीआरडीओच्या ५० हून अधिक प्रयोगशाळा विविध क्षेत्रातील संशोधन करत आहे.

तर डीआयएटीने देखील संरक्षण क्षेत्रासाठी अशा विविध तंत्रज्ञानाच्या विकासात प्रयत्न केले आहेत. परंतु यामध्ये अधिक गती आणण्याची गरज आहे.’’ अशा कित्येक प्रणाली आहेत ज्या सुरवातीला संरक्षण क्षेत्रांसाठी विकसित करण्यात आल्या मात्र आता त्याचा वापर मोठ्या प्रमाणात सर्व सामान्य नागरिकांद्वारे ही केला जात आहे.

त्यामध्ये दिशानिर्देशक प्रणालीचा समावेश आहे. त्यामुळे संरक्षण आणि सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरेल अशा नावीन्याचा प्रोत्‍साहन देण्याची गरज आहे. यावेळी कामत म्हणाले, ‘‘विविध क्षेत्रातून पदवी मिळविल्यावर त्‍याचा देशासाठी कसा उपयोग होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जागतिक स्तरावर भारताला तांत्रिक क्षेत्रातील नेतृत्‍व करणारे देश म्‍हणून स्थापित करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी पुढील २५ वर्षे अत्यंत महत्त्वाचे आहेत.’’

दीक्षान्त सोहळ्यानंतर सिंह यांनी डीआयएटीमध्ये केलेल्या विविध आघाडीवरील संशोधन प्रकल्पांची पाहणी केली. यामध्ये बायोमेडिकल हेल्थ-केअर उपकरण, ड्रोन इंटरसेप्शन आणि लढाऊ तंत्रज्ञान, न्यूक्लिअर डायमंड बॅटरी आदींचा समावेश होता.

‘कॉन्टॅक्‍टलेस वारफेअर’मुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासावर भर

मागील काही दशकांमध्ये जागतिक पातळीवर मोठे बदल घडत असून यामध्‍ये सर्वाधिक वेगाने युद्धाचे स्‍वरूप बदलत आहे. पारंपरिक युद्धाच्या धोक्यांबरोबरच आता सायबर आणि अवकाश डोमेनमधील धोक्यांचा ही सामना करावा लागत आहे. त्यात ‘कॉन्टॅक्टलेस’ युद्धाचे स्वरूप यामुळे संरक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची गरज अधोरेखित होत आहे.

अशात आपल्यापेक्षा प्रगत तंत्रज्ञान असलेले शत्रू देश हे आपल्या देशासाठी चिंतेचे कारण ठरू शकते. यासाठी अशा आव्हानांना तोंड देण्याऱ्या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी नावीन्याची गरज असल्याचे सिंह यांनी नमूद केले.

सिंह म्हणाले...

- भारत हे स्टार्टअप्ससाठी दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे केंद्र असून संरक्षण मंत्रालयाला यामाध्यमातून सातत्याने नवनवीन कल्पना मिळत आहेत

- भारतीय स्टार्टअप्स संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या प्रयत्नात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे

- संरक्षण निर्यातीत अलीकडच्या वर्षांत अनेक पटींनी वाढ झाली

- २०२२-२३ या आर्थिक वर्षात १६ हजार कोटी रुपयांपर्यंतचे निर्यात

- भारत अनेक देशांना संरक्षण उपकरणे निर्यात करत असून अनेकांनी देशाच्या उत्पादन क्षमतांमध्ये स्वारस्य आणि विश्वास दाखवला

- संरक्षण मंत्रालयाने सशस्त्र दलांसाठी ४११ यंत्रणा/उपकरणे असलेल्या स्वदेशीकरण याद्या जाहीर केल्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com