Vidhansabha 2019 : हडपसरमध्ये दहा इच्छुक उमेदवारांचे 13 अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी हडपसर मतदारसंघातून भाजपचे योगेश टिळेकर, मनसेकडून वसंत मोरे यांच्यासह एकूण दहा उमेदवारांनी 13 अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून चेतन तुपे हे उद्या दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत

Vidhansabha 2019 : पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी हडपसर मतदारसंघातून भाजपचे योगेश टिळेकर, मनसेकडून वसंत मोरे यांच्यासह एकूण दहा उमेदवारांनी 13 अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून चेतन तुपे हे उद्या दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत

भाजपचे उमेदवार टिळेकर यांनी कोंढवा गोकुळ नगर भागातून भव्य रॅली काढून हडपसर येथील निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल केला. तसेच, मनसेचे उमेदवार मोरे यांनीही कात्रज येथून भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोन्ही उमेदवारांनी आज शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केले. वंचित विकास आघाडीकडून घनश्याम बापू हाके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी दाखल उमेदवारांचे अर्ज
योगेश पुंडलिक टिळेकर - भाजप 
वसंत कृष्णाजी मोरे - मनसे 
घनश्याम आनंद हाके - वंचित बहुजन आघाडी
गंगाधर विठ्ठल बधे - अपक्ष 
दीपक महादेव जाधव - बसप 
खंडू सतीश लोंढे - अपक्ष
राकेश हारकू वाल्मिकी - अपक्ष 
ए सईद अरकाटी - अपक्ष
ऍड तौसिफ शेख - अपक्ष
कृपाल कृष्णराव कलुसकर - प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 13 applications of 10 interested candidates were filed in Hadapsar Vidhan Sabha Constituency at Maharashtra 2019