माळेगाव - माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेत आजवर 'ब' वर्ग संस्था मतदार संघातील १३ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. या प्रक्रियेत मात्र संस्था मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अर्ज कायम राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.