
पुणे - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पालकांचे नुकसान टाळण्यासाठी अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. शिक्षण विभागाकडून तेरा शाळांची नावे जाहीर केली असून, या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असे आवाहनही करण्यात आले आहे. तर अनधिकृत शाळांनी जर शाळा सुरू ठेवली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी मंगळवारी (ता.८) दिला.