Vidi Bhor
sakal
मंचर - अवसरी खुर्द-भोरवाडी (ता. आंबेगाव) येथील विदी नंदकुमार भोर (वय-१३) हिने पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद नदीवर देशपातळीवर झालेल्या जलतरण स्पर्धेत तब्बल ८१ किलोमीटरचे अंतर ११ तास ५९ मिनिटांत पूर्ण केले. अहिरण घाट ते गोरा बाजार या अत्यंत खडतर प्रवाहात झालेल्या स्पर्धेत तिने मुलींच्या गटात द्वितीय क्रमांक पटकावला.एकूण २०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.