पुणे जिल्ह्यात बुधवारी १३० नवे कोरोना रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patient

पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता.२) दिवसभरात १३० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट ३४७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे जिल्ह्यात बुधवारी १३० नवे कोरोना रुग्ण

पुणे - पुणे जिल्ह्यात (Pune District) बुधवारी (ता.२) दिवसभरात १३० नवे कोरोना रुग्ण (Corona Patients) आढळून आले आहेत. याउलट ३४७ जण कोरोनामुक्त (Corona Free) झाले आहेत. पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू (Death) झाला नाही. दिवसभरात जिल्ह्यात केवळ एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला असून हा मृत्यू पिंपरी चिंचवडमधील आहे.

जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील ६५ रुग्ण आहेत. दिवसात पिंपरी चिंचवडमध्ये २६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ३३, नगरपालिका हद्दीत दोन आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील चार रुग्णांचा समावेश आहे. एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १८८ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ७६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६५, नगरपालिका हद्दीतील सात आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ११ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

हेही वाचा: संचारबंदी शिथिल होताच, युक्रेनच्या सीमा ओलांडा आणि बाहेर पडा; भारत सरकारच्या सूचना

सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यात एकूण १ हजार ८३३ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. एकूण सक्रिय रुग्णांपैकी शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये मिळून २१२ जणांवर उपचार सुरु आहेत. उर्वरित १ हजार ६२१ जण हे गृह विलगीकरणात आहेत. जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील ९४३ रुग्ण आहेत. शहरातील एकूण रुग्णांपैकी १२६ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार करण्यात येत आहेत. उर्वरित ८१७ जण गृह विलगीकरणात आहेत.

Web Title: 130 New Corona Patients Found In Pune District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top