साडेतेराशे कोटींचे पिंपरी महापालिकेचे रेकॉर्ड गायब

pcmc
pcmc

पिंपरी - महापालिकेच्या विविध विभागांतील १३३९ कोटी ९९ लाख ९४ हजार रुपयांच्या रकमेची कागदपत्रे गायब झाली आहेत. १९५ कोटी २७ लाखांची अर्धवट कागदपत्रे उपलब्ध झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

महापालिकेच्या विभागांकडून विकास कामांवर होणारा खर्च व जमांच्या रकमांचे उपलब्ध कागदपत्रांच्या आधारावर तपासणी केली जाते. त्याचा साप्ताहिक अहवाल लेखापरीक्षण विभागाकडून स्थायी समितीस सादर केला जातो. मागील आर्थिक वर्षातील लेखापरीक्षण स्थायी समितीसमोर सादर केले जाते. मात्र, विविध विभाग, क्षेत्रीय कार्यालय, रुग्णालये, शाळा, महाविद्यालय यांच्याकडून २००० पासून नोव्हेंबर २०१८ पर्यंत सुमारे १३४० कोटींच्या खर्चाची कागदपत्रे गायब झाली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com