Loni Kalbhor News : कोचिंग क्लासला गेलेली १४ वर्षीय मुलगी बेपत्ता; भावाचे लक्ष नसल्याची संधी साधून पळवून नेल्याचा संशय

हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत खाजगी कोचिंग क्लासला गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली.
Crime

Crime

sakal

Updated on

लोणी काळभोर - हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत खाजगी कोचिंग क्लासला गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवारी (१४ एप्रिल) रोजी सकाळी १० ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com