कोणत्याही गोष्टींचा अतिरेक चुकीचा - प्रतापराव पवार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 September 2020

सध्या निसर्गाचा असमतोल देखील वाढत चालला आहे. त्यातून कोरोनासारखे साथीचे रोग येत आहेत. त्यामुळे कोणत्याही गोष्टींचा अतिरेक होऊ नये, असे मत "सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी मंगळवारी व्यक्त केले. 

पुणे- "चीनसारख्या देशांना अतिप्रखर देशाभिमान आहे. त्याचा परिणाम जगावर होतोय. अनेक ठिकाणी धर्माचा अतिरेक होत असल्याचे पाहायला मिळते. सध्या निसर्गाचा असमतोल देखील वाढत चालला आहे. त्यातून कोरोनासारखे साथीचे रोग येत आहेत. त्यामुळे कोणत्याही गोष्टींचा अतिरेक होऊ नये, असे मत "सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी मंगळवारी व्यक्त केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना जीतो संस्थेच्या चौदाव्या वर्धापनदिनानिमित्त पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. "ऍपेक्‍स जीतो'चे उपाध्यक्ष विजय भंडारी, "जीतो पुणे चॅप्टर'चे अध्यक्ष कांतिलाल ओसवाल, राजेश सांकला, ज्येष्ठ वकील एस. के. जैन, अजय मेहता, देविचंद जैन, आचल जैन, विजयकांत कोठारी, अजित सेटिया, अशोक हिंगड आदी यावेळी उपस्थित होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पवार म्हणाले, ""कोविड-19 का आला? याचा विचार केला तर ही एक शिक्षा आहे, असे अधिकृतपणे सांगता येईल. गेल्या 100 ते 200 वर्षात सृष्टीच्या झालेल्या नाशाचे हे परिणाम आहेत. पूर येणे, तापमान वाढणे यातून निसर्ग सतत धोक्‍याची सूचना देतो. आपण केलेल्या चांगल्या-वाईट कृत्याचे त्याप्रमाणे परिणाम भोगावे लागतात. आपण सर्व काही सुख प्राप्तीसाठी करत आहोत. परंतु त्याचे परिणाम म्हणून कोविड-19 सारख्या साथ येत आहेत. त्यामुळे आपण कुठे तरी थांबले पाहिजे, याचा विचार आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हायला हवा. "जीतो' आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करते. त्यामुळे या संस्थेने भविष्यात त्या दृष्टीने विचार करायला हवा. "जीतो' विविध प्रकारचे सामाजिक कामे करीत आहे. त्यातून अनेकांना नवी दिशा मिळाली आहे.'' विजय भंडारी यांनी "जीतो'च्या सामाजिक कामाबद्दल माहिती दिली. कांतिलाल ओसवाल यांनी प्रास्ताविक केले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यांना मिळाले पुरस्कार 
जीवन गौरव - अमीचंद राठोड, समाज सेवा - प्रकाश धारिवाल, शिक्षण - दीपक शहा, औद्योगिक - सुहास खाबिया, महिला उद्योजक - सुजाता शहा, युवा उद्योजक - राहुल दर्डा. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 14th anniversary of Jeeto the award was presented by Prataprao Pawar