शिवणे ते नांदेड सिटीच्या नवीन पुलासाठी१५ कोटीचा निधी मंजूर करून घेणार

शिवणे ते नांदेड सिटीच्या नवीन पुलासाठी१५ कोटीचा निधी मंजूर करून घेणार

खडकवासला : हवेली तालुक्यातील मुठा नदीवरील शिवणे ते नांदेड सिटीला जोडणारा नदीवरील पूल धोकादायक झाला आहे.या ठिकाणी नवीन पुलाच्या बांधकामासाठी ९ आणि भूसंपादनासाठी ६ कोटी असा एकूण १५ कोटी रुपयांचा निधी बांधकाम विभागाकडून मंजूर करून घेणार आहोत त्यासाठीची कार्यवाही सुरु केली. अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी बुधवारी विधानसभेत दिली. 

शिवणे ते नांदेड सिटीला जोडणारा नदीवरील पूल धोकादायक झाला आहे. या बाबत खडकवासला मतदार संघाचे आमदार भिमराव तापकीर यांची अर्धा तास चर्चा स्वीकृत झाली होती. यावेळी सदनात बोलतांना भीमराव तापकीर यांनी हा पूल अतिशय धोकादायक झाला असून हा पुल एकेरी वाहतूकीसाठी असून नागरी वस्ती वाढल्याने पुलावर वाहतुकीचा प्रचंड ताण येत असल्याचे सांगून हा पूल इतर जिल्हा मार्गात येत असल्याने त्याला निधी मिळत नसल्याचे सांगितले. या पुलाचा मुख्य जिल्हा मार्गात समावेश करून नाबार्ड अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.  

या प्रश्नी सदनात माहिती देताना ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सदरचा पूल पावसाळ्यात पाण्याखाली  जात असून हा पूल शहरालगत असून नागरी वस्तीत असल्याने वाहनांची वर्दळ जास्त असल्याने वाहतुकीसाठी अपुरा पडत असल्याचे मान्य करून या ठिकाणी नवीन पुलाच्या बांधकामासाठी ९ आणि भूसंपादनासाठी ६ कोटी असा एकूण १५ कोटी रुपयांचा निधी बांधकाम विभागाकडून मंजूर करून घेणार आहोत त्यासाठीची कार्यवाही सुरु केली असून आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजन मार्फत ही निधी उपलब्ध करून घेऊ अशी माहिती दिली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com