उरुळी कांचन - विनापरवाना गोमांस सदृश्य जनावरे कापून त्याचे मांस बेकायदेशीरपणे विक्री करण्याचा प्रकार कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन परिसरात गोरक्षकांनी शुक्रवारी (ता. ८) पहाटे साडेबारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आणला आहे. तर याप्रकरणी प्रकाश बाळकृष्ण खोले (वय २९, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर ता. हवेली जि पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.