Pune Bridge Damage : चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक धोक्यात; दगडी पूल खचल्यामुळे मोठ्या अपघाताचा धोका निर्माण
Stone Bridge Subsides in Chakan : चाकण-शिक्रापूर मार्गावरील १५० वर्ष जुना ब्रिटिशकालीन पूल खचला असून, तो केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. स्थानिक नागरिकांनी 'एमएसआयडीसी'कडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
चाकण : येथील चाकण-शिक्रापूर मार्गावरील मेदनकरवाडी फाट्यावरील ब्रिटिशकालीन दगडी बांधकामातील पूल साधारणपणे दीड ते दोन फूट खचला आहे. त्यामुळे मार्गावरील पुलाला मोठा धोका निर्माण झाला आहे.