Pune News : कात्रज प्राणी संग्रहालयातील १६ हरणांचा मृत्यू, लाळ खुरकूत रोगामुळे
Rajiv Gandhi Zoological Park : कात्रज प्राणी संग्रहालयातील १६ चितळांचा लाळ खुरकूत या संसर्गजन्य रोगामुळे मृत्यू झाल्याचे उघडकीस आले असून, राज्य व केंद्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
पुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील १६ चितळ प्रकारातील हरणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या हरणांचा मृत्यू लाळ खुरकूत या आजारामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.