चायनीस का उघडले या कारणावरुन एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी चौघा विरुध्द गुन्हा दाखल
अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; चौघांविरुद्ध गुन्हा
मंगळवेढा, ता. ७ : मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात एका १६ वर्षीय मुलीस ‘तू चायनीज का उघडले आहे, ही जागा आमची आहे’, असे म्हणत तिला अश्लील शिवीगाळ केली.. तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी निर्मला स्वामी, दिलीप स्वामी, शोभा स्वामी, कैलास स्वामी (सर्व रा. भोसे) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
यातील पीडित मुलगी गुरुवारी (ता. ५) सकाळी १० वाजता तिच्या आत्यासह भोसे येथे चायनीज सेंटर या ठिकाणी गेली असता वरील संशयितांनी तेथे येऊन मुलीला जवळ ओढून टी- शर्ट फाडला व तिच्याशी अश्लील वर्तन केले. शिवीगाळ करत तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. दरम्यान, पीडितेची आत्या हिलाही त्यांनी मारहाण केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विनोद लातूरकर हे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

