वाघोली - आठडेभरात परवाना नसलेल्या व अटी व शर्तीचे पालन न करणाऱ्या भावडी व लोणीकंद येथील १७ खडी क्रशरला ताळे लावण्यात आले. हवेली तहसिल विभागाने ही कारवाई केली. टप्या टप्याने सर्वच खडी क्रशर व खाणींची तपासणी करणार असल्याचे तहसील विभागाने स्पष्ट केले.
सहा दिवसापूर्वी भावडी येथील खडी क्रशर ची तपासणी करण्यात आली. यामध्ये १० खडी क्रशर ला परवाना नव्हता. पर्यावरण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र नसणे, बिनशेती परवाना विक्री परवाना नसणे या बाबी आढळून आल्या. पर्यावरण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र असूनही त्या प्रमाणपत्रातील अटी व शर्तींचे पालन न केल्यामुळे काही क्रशर वर कारवाई करण्यात आली.
तर मंगळवारी लोणीकंद येथील क्रशर ची तपासणी करण्यात आली. यामध्ये सात क्रशर विना परवाना आढळून आले. ते ही सील करण्यात आले. हवेलीच्या अपर तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
शासनाची परवानगी न घेता तसेच नियमांचे उल्लंघन करून खड़ी क्रशर चालवत असल्याबाबत अनेक तक्रारी तहसील कार्यालयाला प्राप्त झाल्या होत्या. याबाबत काही नागरिक आंदोलन करणार असल्याचे निवेदनही प्राप्त झाले. यामुळे या भागात खडी क्रशरची तपासणी मोहीम राबविण्यात आली.
टप्या टप्याने सर्वच खडी क्रशर व खाणींची तपासणी करणार असल्याचे कोलते यांनी स्पष्ट केले. खाणीतूनही परवान्यापेक्षा जास्त उत्खनन होत असल्याच्याही तक्रारी येत आहेत. यामुळे ड्रोनच्या सहायाने मोजणी होईल. असेही त्यांनी सांगीतले.
शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॅगची नोंदणी करावी
हवेली तालुक्यामध्ये ॲग्री स्टॅगच्या नोंदणीचे प्रमाण अत्यंत कमी आहे ही नोंदणी केली नाही तर यापुढे त्यांना कोणत्याही कृषीविषयक सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही. यामुळे ॲग्री स्टॅगचा नोंदणी क्रमांक प्राप्त करून घ्यावा. असे आवाहन तहसीलदार कोलते यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.