इंदापूर : बेमुदत संप आंदोलनात सलग पाचव्या दिवसापर्यंत १९ कर्मचाऱ्यांचे निलंबन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूर : बेमुदत संप आंदोलनात सलग पाचव्या दिवसापर्यंत १९ कर्मचाऱ्यांचे निलंबन

इंदापूर : बेमुदत संप आंदोलनात सलग पाचव्या दिवसापर्यंत १९ कर्मचाऱ्यांचे निलंबन

इंदापूर - इंदापूर एस टी आगारासमोर एस टी कर्मचाऱ्यांचे आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू बेमुदत संप आंदोलनात सलग पाचव्या दिवसापर्यंत १९ कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे. एस टी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या रास्त असून त्या तातडीने मंजूर कराव्यात, १९ कर्मचाऱ्यांचे झालेले निलंबन तातडीने रद्द करावे अशी मागणी भाजप जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य माऊली चवरे, नगर परिषद गट नेते कैलास कदम, ओबीसी तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे, शिवाजी तरंगे, राम आसबे, विशाल पवार, प्रशांत गलांडे, सामाजिक कार्यकर्ते हमीद आतार, अशोक पोळ, भैय्यासाहेब शिंदे, सोमनाथ बागडे यांनी करून या आंदोलनास पाठिंबा दिला.

यावेळी पांडुरंग शिंदे म्हणाले, एस टी च्या कर्मचाऱ्यांनी शासनात विलीनीकरण करावे अशी प्रमुख रास्त मागणी केली असून त्यास आमचा पाठिंबा आहे.शासनाने वेळ निर्धारित करून ही मागणी मान्य केल्याचे पत्र देणे गरजेचे आहे.

हेही वाचा: Pune : स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वयंपूर्ण गोव्यासाठी कार्य करावे

माऊली चवरे म्हणाले, एस टी कर्मचाऱ्यांच्या ३९ आत्महत्या झाल्यानंतर सुद्धा हे सरकार जागे होत नाही हे दुर्दैव आहे. एकीकडे सरकार संपामुळे हजारो कामगारांना निलंबित करत आहे तर दुसरीकडे त्यांचे पैसे वेळेत देत नाही. त्यामुळे त्यांच्या आत्महत्यास सरकारला जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबास ५० लाख रुपये देवून त्यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी महेंद्र काळे, आबासाहेब थोरात, रणजित पाटील, प्रविण सलगर, माऊली वाघमोडे उपस्थित होते.

दरम्यान एस टी कर्मचाऱ्यांनी स्वामी समर्थ प्रतिमेची पूजा करून सरकारला सुबुद्धी दे अशी प्रार्थना केली.

loading image
go to top