आपत्तीग्रस्तांना पालिकेकडून १९ लाख रुपयांची मदत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

पुणे - पाटील इस्टेट शेजारील झोपडपट्टीला लागलेल्या आगीत ९० पेक्षा अधिक झोपड्या जळून सहाशेपेक्षा अधिक नागरिक बेघर झाले आहेत. तातडीची मदत म्हणून महापालिकेने सुमारे १९ लाख रुपये तत्काळ मंजूर केले आहेत.  प्रशासनाकडून ७३ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

पुणे - पाटील इस्टेट शेजारील झोपडपट्टीला लागलेल्या आगीत ९० पेक्षा अधिक झोपड्या जळून सहाशेपेक्षा अधिक नागरिक बेघर झाले आहेत. तातडीची मदत म्हणून महापालिकेने सुमारे १९ लाख रुपये तत्काळ मंजूर केले आहेत.  प्रशासनाकडून ७३ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

पत्रे, वासे आणि अन्य साहित्यासाठी महापालिकेने १९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या घटनेसंदर्भात बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने सांगितले.आपत्तिग्रस्तांच्या मदतीसाठी विविध सामाजिक संस्था आणि गणेश मंडळे पुढे आली असून, त्यांच्याकडून खाद्यपदार्थ आणि कपड्यांचे वाटप करण्यात येत आहे. प्रशासनाने लवकर निर्णय घेऊन आमची योग्य सोय करावी, अशी मागणी आपत्तिग्रस्तांनी केली आहे.

आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात येईल. सध्या त्यांना पत्रे आणि वासे देण्यात येत आहेत. त्यासाठी महापालिकेने निधी उपलब्ध करून दिला आहे.
- मुक्ता टिळक, महापौर

निवासाची सोय शाळेमध्ये
आपत्तिग्रस्तांच्या निवासाची सोय डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारत न्यू इंग्लिश स्कूल आणि खाशाबा जाधव शाळा या महापालिकेच्या शाळेत करण्यात आली आहे. या शाळा येत्या मंगळवारपर्यंत (ता. ४) बंद ठेवण्यात आल्या आहेत. शाळेमध्ये सुमारे ६०० पेक्षा अधिक नागरिक राहत आहेत. मात्र, त्याठिकाणी पायाभूत सुविधांची कमतरता असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. 

Web Title: 19 lakhs rupees from the municipal corporation