बीआरटी मार्गावर १९० कर्मचारी

अवधूत कुलकर्णी
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

पिंपरी - अपघात रोखण्यासाठी व बीआरटी मार्गातून अन्य वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी शहरातील बीआरटी मार्गावर पीएमपीएमएल प्रशासनाने तब्बल १९० कर्मचारी नेमले आहेत. त्यांच्या वेतनासाठी दरमहा २८ लाख रुपये खर्च होत आहेत. 

पिंपरी - अपघात रोखण्यासाठी व बीआरटी मार्गातून अन्य वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी शहरातील बीआरटी मार्गावर पीएमपीएमएल प्रशासनाने तब्बल १९० कर्मचारी नेमले आहेत. त्यांच्या वेतनासाठी दरमहा २८ लाख रुपये खर्च होत आहेत. 

पीएमपीएमएलने निगडी-दापोडी बीआरटी मार्गावर शंभर, किवळे-मुकाई चौक-सांगवी मार्गावर ४६, नाशिक फाटा-वाकड मार्गावर ४४ कर्मचारी नेमले आहेत. बीआरटी मार्ग २०१५ मध्ये सुरू झाल्यापासून त्यांची नियुक्ती केली आहे. नियमानुसार बीआरटी मार्गातून जाण्यास केवळच पीएमपी बसला परवानगी आहे. अन्य वाहनांनी या मार्गाचा वापर केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते. या मार्गातून खासगी वाहने गेल्याने अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. 

बीआरटी मार्गातून खासगी वाहन गेल्यास संबंधित वाहनचालकांवर कायदेशीर कारवाईचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला. मात्र, कारवाई होत नसल्यामुळे ही वाहने बिनदिक्कतपणे या मार्गातून जातात. पोलिसांची व सरकारी वाहनेही नियमभंग करीत या मार्गाचा वापर करतात. ते वाहनचालक दोरी धरून थांबलेल्या कर्मचाऱ्यांना मार्ग मोकळा करण्याचा आदेश देत असल्याचे दिसून आले आहे. 

बीआरटी मार्गांवर ऑटोमेटेड बूम बॅरिअर लावणे खर्चिक आहे. तसेच, त्याची देखभाल दुरुस्तीचा खर्चही जास्त आहे. त्याऐवजी सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतला.  
- विजय भोजने,  प्रवक्ता, बीआरटी, महापालिका 

निगडी-दापोडी, किवळे-मुकाई चौक-सांगवी आणि नाशिक फाटा-वाकड या बीआरटी मार्गांच्या प्रवेशमार्गांवर २०१५ पासून कर्मचारी नेमले आहेत. एका कर्मचाऱ्याला महिन्याला १५ हजार रुपये वेतन देण्यात येते. किवळे-सांगवी आणि नाशिकफाटा-वाकड मार्गावर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असल्याने काही कर्मचारी अन्यत्र वर्ग केले आहेत.   
- सुभाष गायकवाड,  जनसंपर्क अधिकारी, पीएमपी, पुणे

Web Title: 190 staffs on the BRT route