
पुणे : आषाढी वारीसाठी राज्य सरकारने पंढरपूर येथे येणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यासाठी दोन कोटी सहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्णयानुसार २४ तास वैद्यकीय सेवा देण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्यात येणार आहेत.