Pune News : नवीन ठेकेदार नियुक्त करूनही ८ इ-टॉयलेट बंदच

Pune Municipal Corporation : पुण्यात खासदार निधीतून उभारलेली ई-टॉयलेट सुविधा ठप्प असून, नागरिकांसाठी ती सामान्य स्वच्छतागृह म्हणून खुली करण्याची मागणी विवेक वेलणकर यांनी केली आहे.
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSakal
Updated on

पुणे : पुणे शहरात तत्कालीन खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीतून दोन कोटी रुपये खर्च करून ११ ठिकाणी इ टॉयलेट बांधण्यात आले होते. पण हे टॉयलेट एका वर्षानंतर बंद पडले. त्यामुळे दोन कोटी रुपयांचा निधी वाया गेला. हे बंद पडलेले टॉयलेट पुन्हा सुरु करण्यासाठी ठेकेदार नियुक्त केला असला तरी ११ पैकी केवळ तीन टॉयलेट सुरु झाले आहेत. हे इ टॉयलेट साध्या स्वच्छतागृहात रुपांतरीत करून त्यांचा वापर करण्यासाठी ती नागरिकांसाठी खुली करावीत अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com