esakal | प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकरांसह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकरांसह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकरांसह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ग्राहकाने सदनिका खरेदीसाठी पूर्ण पैसे भरुनही त्याचा वेळेत ताबा दिला नाही, तसेच सदनिका खरेदी व्यवहारात 2 कोटी 40 लाख रुपये परत मागितल्याच्या कारणावरुन उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यासह तिघाविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौतम पाषाणकर, रीनल पाषाणकर व दिप विजय पुरोहीत अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. याप्रकरणी नरेंद्र पंडितराव पाटील (वय 42, रा. पंचवटी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील यांनी "प्रोक्झिमा क्रिएशन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन" खराडी येथील बांधकाम प्रकल्पातील "सी" इमारतीमध्ये "पी 101" व "पी 102" अशा दोन सदनिका खरेदी करण्याचे निश्चित केले होते, त्यांच्यात ठरल्याप्रमाणे 2 कोटी 87 लाख रूपयांचा करारनामा ही झाला होता.

या व्यवहारापोटी पाटील यांच्याकडुन 2 कोटी 40 लाख रुपये घेण्यात आले. पैसे घेऊनही त्यांना सदनिकेचा ताबा दिला नाही, तसेच त्याचे नोंदणीकृत दस्तही केले नाहीत.याउलट "पी 102" सदनिकेचे खरेदी खत सुशील झोररतर्फे कुलमुखत्यारपत्र मनीष गोरद यांना देण्यात आले, तर "पी 101" सदनिका गणेश शिंदे यांच्या नावे करण्यात आली.याप्रकरणी फिर्यादी ने त्यांना जाब विचारला, तेव्हा फिर्यादीस पाषाणकर यांच्या जंगली महाराज रस्ता येथील कार्यालयात बोलविण्यात आले. तेथे त्यांना पाषाणकर व त्यांच्या नोकरांनी पाटील यांना जबर मारहाण केली, या घटनेत पाषाणकर यांचा पाय मोडला. या घटनेनंतर त्यांनी उपचार घेतल्यानंतर पोलिसांकडे फिर्याद दिली.

नोव्हेंबर 2020 मध्ये व्यावसायात आलेल्या नुकसानीमुळे नैराश्यतुन गौतम पाषाणकर हे बेपत्ता झाले होते. पुणे पोलिसांनी अथक प्रयत्न करुन अनेक दिवसांच्या प्रयत्ननंतर पोलिसांनी पाषाणकर यांचा शोध घेऊन त्यांना पुण्यात आणले होते.

loading image
go to top