esakal | पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात ; 2 ठार, 1 जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात ; 2 ठार, 1 जखमी

पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात ; 2 ठार, 1 जखमी

sakal_logo
By
जनार्दन दांडगे.

लोणी काळभोर, (पुणे ) : पुणे सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील धनश्री मंगल कार्यालया समोर ट्रक व कंटेनर या मध्ये झालेल्या अपघातात दोन जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ०९ ) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. (2 killed, 1 injured in Accident on Pune-Solapur Highway)

शकील इस्माईल शेख (वय- ३२, रा. बसव कल्याण,जि. बिदर, राज्य- कर्नाटक ), व अनिल अंकुश सूर्यवंशी (वय- ३५ , रा. केळगाव, ता. निलंगा, जि. लातूर ) असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे असून आण्णासाहेब गणपत गायकवाड (वय- ४४, रा. मुंढवा, पुणे) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ''शकील शेख व अनिल सूर्यवंशी हे पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पुणे बाजूकडून सोलापूरच्या बाजूकडे कंटेनरने जात होते. त्यावेळी आण्णासाहेब गायकवाड कुंजीरवाडी हद्दीतील हे धनश्री मंगल कार्यालया समोरून पुणे बाजूकडून सोलापूरच्या बाजूला जाण्यासाठी महामार्गावरील दुभाजकावरून जात होते. यावेळेस शकील व अनिल हे बसलेल्या कंटेनर ने पाठीमागून येऊन ट्रकला जोरदार धडक दिली. यातच शकील याचा जागेवरच मृत्यू झाला तर अनिल याचा एका खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.''

loading image