पुण्यात 'I Love Narhe' पॉईंटजवळ भूमकर पुलावर भीषण अपघातात 2 ठार तर 3 जखमी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

मिळालेल्या माहितीनुसार कात्रजच्या बोगद्यातून दारुची वाहतूक करणारा ट्रक(MH.12.P.Q.8736)  जात असताना नर्हे येथील I Love Narhe सेल्फी पॉईंटजवळ आल्यानंतर  पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या माल वाहतूक ट्रकने (MH.18.AA.6681) पाठीमागून जोरात धडक दिली आहे. यात टॅकच्या समोरील बाजूचे मोठे नुकसान झाल्याने चालक आणि त्याच्यासोबत असलेले तिघे त्यात अडकेले.

पुणे : कात्रज बोगद्याकडून नर्हेच्या दिशेने जाताना भूमकर पुलावर आज पहाटे दोन ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. दारुची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भरधाव ट्रकने धडक दिल्याने ट्रकने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की ट्रकच्या समोरील कॅबिनेटचा चेंदामेंदा झाला आणि यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. 1 जण गंभीर जखमी झाला तर 2 जण किरकोळ जखमी झाले आहे. दरम्यान हा अपघात झालेला असतानाच काही अंतरावर स्पेअरपार्ट वाहतूक करणारा आयशर देखील  उलटला. घटनास्थळी अग्निशमन दल आणि सिंहगड पोलिस दाखल झाले आहेत. ट्रकमध्ये अडकलेले मृतदेह आणि जखमींना बाहेर काढून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवले आहे.

अद्याप मृत व्यक्तींची ओळख पटली नसून त्यांचा नाव, पत्ता घेण्याचे काम सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसारकात्रजच्या बोगद्यातून दारुची वाहतूक करणारा ट्रक(MH.12.P.Q.8736)  जात असताना नर्हे येथील I Love Narhe सेल्फी पॉईंटजवळ आल्यानंतर पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या माल वाहतूक ट्रकने (MH.18.AA.6681) पाठीमागून जोरात धडक दिली आहे. यात टॅकच्या समोरील बाजूचे मोठे नुकसान झाल्याने चालक आणि त्याच्यासोबत असलेले तिघे त्यात अडकेले. दरम्यान दोघांचा जागीच मृत्यू  झाला तर एकजण गंभीर जखमी आहे. मृतदेह अडकून रुग्णालयात पकडले होते. पोलिस अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी अडकलेले मृतदेह बाहेर काढले आहेत. तसेच जखमींना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 

या परिसरात हा अपघाता झाला असताना काही अंतरावर स्पेअर पार्ट घेऊन जात असलेला एक आयशरला दुसऱ्या एका वाहन घासून गेल्याने उलटला आहे. मात्र, या अपघात दोघे किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्यामुळे पोलिसांनी तक्रार दाखल झाली नसल्याचे सांगितले. अपघातग्रस्त टॅ्क क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आला असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.  

पुण्यासह राज्यातील प्राचीन मंदिरांचे जतन आता MSRDCकडे!​
 

नवीन कात्रज बोगदा दरी पुलाकडून साताऱ्याहून -मुंबईकडे जाताना भरधाव कंटनेरने पोलिसांच्या गाडीला उडविले आहे. सकाळी साडे नऊच्या सुमारास हा अपघात  गाडीचा चुरडा झाला असून ग्रामीण पोलिसचे वरिष्ठ पोलिस आणि मदतनीस असे दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.

दरम्यान नवीन कात्रज बोगदा दरी पुलाकडून साताऱ्याहून -मुंबईकडे जाणाऱ्या आणखी एका कंटेनरने 4 वाहानांना उडविल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यामध्ये एका रिक्षाता चुरडा झाला असून सहा महिन्यांच्या बाळासह तीन जण जखमी झाले आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 killed, 3 injured in Bhumkar bridge accident near I Love Narhe Point in Pune