पुण्यातील एका सोसायटीतील `एवढ्या` जणांचे कोरोना रिपोर्ट...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

आई व मुलाला कोरोनाची लागण झाल्याने संपर्कातील २२ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 

une-news">पुणे) : मार्च महिन्यात लॉकडाउन सुरु झाले तेव्हापासून एक ही कोरोना रुग्ण न आढळलेल्या 175 सदनिका असलेल्या गार्डेनिया सोसायटी फेज वन मध्ये आई व मुलगा असे दोन जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असुन त्यांच्या संपर्कात आलेल्या बावीस व्यक्तींना स्वब तपासणी साठी खराडी येथील महापालिकेच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

 पुण्यात पुन्हा टोळी युद्ध, `या` गुंडाचा खून

सदर कोरोना पॉझिटिव्ह महिला (वय 48 )  ससून रुग्णालयात कार्यरत आहे. त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींची कोरोना टेस्ट केली असता महिलेच्या मुलाचा रिपोर्ट् पॉझिटिव्ह आला तर दोन व्यक्तींचे रिपोर्ट् निगेटिव्ह आले. सोसायटीच्या काही रहिवाश्यांकडून कोरोना विषयी गांभीर्याने  घेतले जात नाही. अनेक सोसायट्यांमध्ये  सोशल डिस्टन्सचे पालन न करता सोसायटीच्या क्लब हाऊस मध्ये एकत्रित बसून कॅरम खेळणे आदी प्रकार करतात. त्यामुळे या बावीस व्यक्तींचे रिपोर्ट् काय येईल या काळजीने सोसायटीतील रहिवाशी चिंताग्रस्त  झाले  आहेत.

पुण्यातील इतर बातम्यासाठी येथे- क्लिक करा

पाच दिवसापूर्वी कल्याणीनगर येथे थ्री स्टार हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यामध्ये  सहा जणांना कोरोनाची लागण   झाली होती. दररोज वडगावशेरी, चंदननगर, खराडी, विमाननगर भागात रुग्ण आढळुन येत असले तरी कोरोनाला  हरवून घरी परतणाऱ्याची संख्या अधिक आहे ही एक सकारत्मक बाब आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 person affected by corona