बारामतीकरांनी अनुभवला दहीहंडी व गोविंदांच्या थरांचा थरार

कोविडच्या संकटानंतर यंदा प्रथमच बारामतीकरांनी दहीहंडीचा थरार अनुभवला.
Dahihandi Festival
Dahihandi FestivalSakal

बारामती : कोविडच्या संकटानंतर यंदा प्रथमच बारामतीकरांनी दहीहंडीचा थरार अनुभवला. गोविंदाचा उत्साह आणि मंडळानी केलेली जय्यत तयारी या मुळे यंदाही बारामतीची दहीहंडी प्रेक्षणीय ठरली. यंदा गोविंदांसह प्रेक्षकांचीही संख्या लक्षणीय होती. तीन हत्ती चौकातील मानाच्या स्व. धनंजय भाऊ देशमुख मेमोरियल ट्रस्टद्वारे आयोजित नगरसेवक जयसिंग बबलू देशमुख मित्र परिवाराची दहीहंडी आमराईतील अभिनव दहीहंडी संघाने सहा थर रचत लीलया फोडली. त्यांना 56 हजारांचे पारितोषिक दिले गेले.

माजी नगरसेवक नीलेश इंगुले यांनी तीन हत्ती चौकात लावलेल्या युनिटी फ्रेंडस क्लबची दहीहंडी बारामतीच्याच आमराईतील जय हनुमान दहीहंडी संघाने फोडली. त्यांना 21 हजारांचे पारितोषिक देण्यात आले. करण इंगुले यांच्या खाटिक गल्ली तालिम संघ आयोजित राष्ट्रवादी चषकाची दहीहंडी यंदा योगेश भैय्या जगताप दहीहंडी संघाने सहा थर रचत फोडली. त्यांना 21 हजारांचे पारितोषिक दिले गेले.

कसब्यातील श्री काशिविश्वेश्वर दहीहंडी मंडळाची दहीहंडी काशिविश्वेश्वर संघाने फोडली. अशोकनगर चौकातील अँड. विनोद जावळे यांच्या राज प्रतिष्ठानची दहीहंडी गुनवडीच्या जय भवानी दहीहंडी संघाने पाच थर रचून फोडली. अभिनेत्री कल्याणी सोनने या प्रसंगी उपस्थित होत्या. भिगवण चौकातील ऋतुराज काळे व चंद्रशेखर काळे यांच्या वस्ताद बाजीराव काळे दहीहंडी संघाची दहीहंडी उत्तम धोत्रे यांच्या जय हनुमान दहीहंडी संघाने संघाने फोडली.

क्रांतीसिंह विश्वनाथ दादा गालिंदे चौकातील संतोष गालिंदे, विकास गालिंदे, श्रीनिवास गालिंदे, केतन गालिंदे यांची दहीहंडी आमराईतील विघ्नहर्ता दहीहंडी संघाने पाच थर रचून फोडली. त्यांना 25 हजारांचे बक्षीस दिले गेले. माजी नगरसेवक अभिजीत काळे यांच्या अजितदादा युवा शक्ती दहीहंडी मंडळाची दहीहंडी उभारली होती, मात्र एक दुःखद घटना घडल्याने ही दहीहंडी फोडण्यात आली नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अँड. सुधीर पाटसकर यांच्या एकलव्य चषक दहीहंडी संघाची दहीहंडी भोईराज दहीहंडी मंडळाने फोडली. या प्रसंगी कालीपुत्र कालिचरण महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरिक्षक सुनील महाडीक व महेश ढवाण आणि इतर अधिका-यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com