भारतीय पर्यटकांचा ओघ वाढावा यासाठी टुरिझम मलेशिया प्रयत्नशील

भारतीय पर्यटकांचा ओघ वाढावा यासाठी टुरिझम मलेशिया प्रयत्नशील

Published on

‘वीस लाख भारतीय
मलेशियाला भेट देतील’
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २५: भारतीय पर्यटकांचा ओघ वाढावा यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले असून आगामी काळात २० लाख भारतीय मलेशियाला भेट देतील, असा विश्वास टुरिझम मलेशियाचे संचालक अहमद जोहानिफ मो. अली यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. मलेशियासाठी पर्यटन उद्योग महत्त्वपूर्ण असून हा उद्योग वाढविण्यासाठी हवाई संपर्क जाळे वाढवणे, व्हिसा फ्री आगमन, सिनेमा चित्रीकरणासाठी सवलती आदी प्रकारच्या योजना हाती घेण्यात आल्या असल्याचे अली यांनी नमूद केले.
भारतातील द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांतील लोकांनी मलेशियाला भेट देत तेथील संस्कृती जाणून घ्यावी तसेच पर्यटन स्थळी जाऊन निसर्ग सौंदर्याचा, वैविध्यपूर्ण खानपानाचा आनंद घ्यावा, असा आमचा प्रयत्न आहे. टुरिझम मलेशियाचे ब्रॅंडिंग वाढवण्याच्या दृष्टीने भारतात विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. भारतीय टूर ऑपरेटर्स तसेच ट्रॅव्हल एजंट्स सोबत करार करण्यात आले आहेत. याशिवाय परवडणाऱ्या दरात पॅकेज उपलब्ध करून देण्यासाठी मलेशिया कटिबद्ध असल्याचे अली यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com