esakal | 20 हजार तृतीयपंथीयांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न 

बोलून बातमी शोधा

20 thousand transgender community survival issues in pune city due to lockdown

शहरात सुमारे वीस हजार तृतीयपंथी राहतात. कोथरूड, कर्वेनगर, वारजे, माळवाडी, उत्तमनगर, गोखलेनगर, कोंढवा, हडपसर, अप्पर इंदिरानगर आदी भागात त्यांची वस्ती आहे. तृतियपंथीयांना नोकऱ्या देण्याची मानसिकता समाजात अद्याप निर्माण झालेली नाही. शहरातील बहुतेक तृतीयपंथीयांचा उदरनिर्वाह समाजाकडून मिळणाऱ्या भिक्षेवर होतो. काही वेळा कौटुंबिक समारंभात त्यांना बोलावले ही जाते. परंतु सध्या वाहतूक बंद आहे तसेच कोणतेही कार्यक्रम होत नसल्यामुळे या  तृतियपंथीयांची आर्थिक कोंडी झाली आहे. 

20 हजार तृतीयपंथीयांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न 
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पुणे : कोरोनाच्या संकटामुळे शहरातील तृतियपंथीयांची कोंडी झाली आहे. केंद्र सरकार अथवा महापालिकेच्या कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोचत नसल्यामुळे त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
शहरात सुमारे वीस हजार तृतीयपंथी राहतात. कोथरूड, कर्वेनगर, वारजे, माळवाडी, उत्तमनगर, गोखलेनगर, कोंढवा, हडपसर, अप्पर इंदिरानगर आदी भागात त्यांची वस्ती आहे. तृतियपंथीयांना नोकऱ्या देण्याची मानसिकता समाजात अद्याप निर्माण झालेली नाही. शहरातील बहुतेक तृतीयपंथीयांचा उदरनिर्वाह समाजाकडून मिळणाऱ्या भिक्षेवर होतो. काही वेळा कौटुंबिक समारंभात त्यांना बोलावले ही जाते. परंतु सध्या वाहतूक बंद आहे तसेच कोणतेही कार्यक्रम होत नसल्यामुळे या  तृतियपंथीयांची आर्थिक कोंडी झाली आहे. 

Coronavirus : निजामुद्दीनहून आलेले पिंपरी-चिंचवडमधील 14 जण रुग्णालयात दाखल 

मदत काढण्यासाठी 'निर्भया आनंदी जीवन' तसेच 'एकांश पुणे ट्रस्ट' या स्वयंसेवी संस्थांनी  पुढाकार घेतला आहे. तृतियपंथीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करणाऱ्या सोनाली दळवी यांनी कोथरूड परिसरातील सुमारे पन्नास तृतियपंथीयांना गहू, तांदूळ, चहा, साखर, तेल, जिरे- मोहरी असा एक महिन्यांचा जीवनावश्यक वस्तूंचा साठा नुकताच दिला आहे. शहरातील सर्व तृतियपंथीयांपर्यंत पोचण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे, असे दळवी यांनी सांगितले. केंद्र सरकारने तृतियपंथीयांसाठी काही योजना जाहीर केल्या आहेत. परंतु त्या स्थानिक पातळीवर अद्याप पोचलेल्या नाहीत. महापालिकेच्याही कल्याणकारी योजनांचा फायदाही तृतियपंथीयांना मिळत नाही. 

Coronavirus : निजामुद्दीनहून आलेले पिंपरी-चिंचवडमधील 14 जण रुग्णालयात दाखल
 
या बाबत दळवी म्हणाल्या, "तृतीयपंथी हा देखील समाजाचा एक घटक आहे. हा वर्ग सध्या घरात बसून आहे. परंतु त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. काहीजणांच्या दयेवर ते जगत आहेत. सरकारने काही तरी या बाबत केले पाहिजे अन्यथा या वर्गाचे प्रचंड हाल होतील."

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले,"तृतीयपंथी वर्गाला महापालिका वाऱ्यावर सोडणार नाही. सामाजिक विकास विभागाकडून त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. गरजूंना निवारा केंद्रांत प्रवेश देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येतील".