samagra shiksha abhiyan
sakal
जुन्नर - समग्र शिक्षा मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदांवर नियुक्तीचा मार्ग अखेर मोकळा झाल्याने जिल्ह्यासह राज्यातील समग्र शिक्षा अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय मंगळवार ता. 4 रोजी पारित करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या कंत्राटी सेवकांच्या मागणीला अखेर यश आल्याचे जिल्हा संघर्ष समितीचे प्रसिद्धी प्रमुख रवींद्र तोरणे यांनी सांगितले.