esakal | Vidhan Sabha 2019 : भाजपच्या निषेधार्थ शिवसैनिकांचा राजीनाम्यातून संताप !
sakal

बोलून बातमी शोधा

200 Shiv Sena Party Workers resign in pune

पुणे शहरातील 8 पैकी एकाही मतदारसंघांमध्ये भाजपाने शिवसेनेला एकही जागा दिली नाही. त्याच्या निषेधार्थ कसबा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विशाल धनवडे यांच्यासह 200 कार्यकर्त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे शिवसेनेकडे दिले. 

Vidhan Sabha 2019 : भाजपच्या निषेधार्थ शिवसैनिकांचा राजीनाम्यातून संताप !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहरातील 8 पैकी एकाही मतदारसंघांमध्ये भाजपाने शिवसेनेला एकही जागा दिली नाही. त्याच्या निषेधार्थ कसबा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विशाल धनवडे यांच्यासह 200 कार्यकर्त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे शिवसेनेकडे दिले. 

भाजपकडून शिवसेनेच्या पक्षनेतृत्व वरती बंडखोरा वरती कारवाई करा, असं वारंवार सांगितले जात आहे. पक्षनेतृत्वला आमच्यावरती कारवाई करायला जड जाईल व त्यांना दुःख होईल म्हणून आम्ही आमचे राजीनामे शिवसेनाअध्यक्ष उद्धव ठाकरे व संपर्कप्रमुख संजय राऊत यांच्याकडे सोपवित आहोत.

पुणे शहरामध्ये शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी  आणि कसबा मतदार संकेत भगवा फडकला साठी सर्व पदाधिकारी तयार आहे, असेही धनवडे यांनी स्पष्ट केले. शिवसेनेबद्दल , पक्षातील नेत्यांबद्दल आमच्या मनात कोणताही रोष नाही. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात प्रेमच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुढील काळातही आम्ही मनाने शिवसेबरोबरच असू, असेही त्यांनी सांगितले.