Sangramdurg Ground Fort
sakal
चाकण - चाकण शहर व ऐतिहासिक संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याचा २०० वर्षांपूर्वीचा नकाशा मिळाला आहे. तो पुरातत्त्व विभागाकडे आहे.
चाकण शहराचा व ऐतिहासिक भुईकोट किल्ले संग्रामदुर्गाचा हा दुर्मीळ नकाशा १८१८ मध्ये रेखाटण्यात आला होता. १८२१ मध्ये तो प्रकाशित करण्यात आला. या नकाशाचे रेखाटन ब्रिटिश नकाशाकार व्हॅलेंटाइन ब्लॅकर यांनी केले होते. दोन शतकांपूर्वीचे चाकण शहर, किल्ल्याची रचना, परिसरातील वस्ती, जलप्रवाह आणि भौगोलिक परिस्थिती यांची झलक या ऐतिहासिक नकाशातून पाहायला मिळते.