esakal | Coronavirus : कोरोनाचे राज्यात थैमान; पुण्यात तर...
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus : कोरोनाचे राज्यात थैमान; पुण्यात तर...

शैक्षणिक विभागांचे अध्यापन बंद

Coronavirus : कोरोनाचे राज्यात थैमान; पुण्यात तर...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पुणे : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. यातील मृतांसह बाधितांचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विविध स्तरावरून खबरदारी घेण्यात येत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील शहरी भागातील शाळा आणि महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानंतर आता पुण्यातही विशेष काळजी घेतली जात आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

तसेच महापालिका क्षेत्रांमधील मोठे मॉलही बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी पाच संशयित रुग्ण आढळून आल्याने राज्यातील बाधितांची संख्या 31 झाली असून, देशात 101 जणांना संसर्ग झाला आहे. याशिवाय राज्य सरकारने शुक्रवारी कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तरणतलाव, व्यायामशाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शनिवारी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश जारी केले.

पुण्यातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतली जात आहे. शहर आणि परिसरातील सुमारे 202 उद्यानं अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच सारसबागेतही फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. येथील गणपती मंदिरदेखील दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. 

शैक्षणिक विभागांचे अध्यापन बंद

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने कोरोनासंदर्भात खबरदारीचा उपाय म्हणून अनिश्‍चित काळासाठी शैक्षणिक विभागांचे अध्यापनाचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहे.