esakal | लोणावळ्यात 210 मि.मी. पावसाची नोंद 
sakal

बोलून बातमी शोधा

heavy rain fall in lonavala

लोणावळ्यात 210 मि.मी. पावसाची नोंद 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोणावळा : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा झोडपले असून, बुधवारी (ता. 4) सकाळी आठपर्यंत 210 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 
ऐन सणासुदीत पडत असलेल्या पावसामुळे नागरिकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. लोणावळा परिसरात हंगामात आतापर्यंत एकूण पाच हजार 597 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. लोणावळा नगरपालिकेचे तुंगार्ली, टाटांची वळवण, लोणावळा तलाव, भुशी ही धरणे जुलैच्या पहिल्या सप्ताहातच भरली. मात्र, गेले दोन दिवस पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. 

टाटातर्फे धोक्‍याचा इशारा 
पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास लोणावळा धरणाचा सांडवा द्वारविरहित असल्याने कोणत्याही क्षणी सांडव्यावरून विसर्ग सुरू होण्याची शक्‍यता आहे. वळवण धरण यापूर्वीच शंभर टक्के भरले असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणातून 100 ते 200 क्‍युसेकने नियंत्रित विसर्ग सोडण्यात येणार आहे. धरणाच्या खालील भागातील नदी काठची गावे, वाड्या-वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदी पात्रात प्रवेश करू नये. विजेवरील मोटारी, इंजिने, शेती अवजारे, पशुधन यांची काळजी घेऊन कोणत्याही प्रकारे जीवित, वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

बोरघाटात वाहतूक संथ 
घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू असल्याने पुण्याकडे येणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. विशेषतः खोपोली हद्दीतील बोरघाट पोलिस मदत केंद्र ते अमृतांजन पुलादरम्यान वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक हळूहळू पुढे सरकत आहे. 
 

loading image
go to top