पुणे महापालिका हद्दीत ग्रामीण भागातील २१२ अंगणवाड्या वर्ग

राज्य सरकारने पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २८५ अंगणवाड्या शहरी भागात वर्ग केल्या आहेत.
Anganwadi school
Anganwadi schoolSakal
Summary

राज्य सरकारने पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २८५ अंगणवाड्या शहरी भागात वर्ग केल्या आहेत.

पुणे - राज्य सरकारने (State Government) पुणे जिल्ह्याच्या (Pune District) ग्रामीण भागातील (Rural Area) २८५ अंगणवाड्या (Anganwadi) शहरी भागात वर्ग केल्या आहेत. वर्ग झालेल्या अंगणवाड्या या नगरपालिका, नगरपंचायत आणि महापालिका क्षेत्रात समाविष्ट केल्या आहेत. यापैकी सर्वाधिक २१२ अंगणवाड्यांचे पुणे महापालिका क्षेत्रात समायोजन करण्यात आले आहे. पुण्यात समायोजन करण्यात आलेल्यांमध्ये हवेली तालुक्यातील सर्वाधिक १९९ अंगणवाड्यांचा समावेश आहे.

मागील नऊ वर्षात ग्रामीण भागातील सुमारे ३८ ग्रामपंचायती या पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्या आहेत. मात्र या गावांमधील अंगणवाड्या या ग्रामीण भागातील एकात्मिक बाल विकास प्रकल्पांकडेच कायम होत्या. त्यामुळे गाव शहरी झाले तरी अंगणवाड्या मात्र ग्रामीणच राहिल्या होत्या. या निर्णयाने आता आतापर्यंत ग्रामीण असलेल्या या अंगणवाड्या आता अधिकृतपणे शहरात समाविष्ट झाल्या असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

Anganwadi school
शिवनेरीच्या पायथ्याशी बसविण्यात येणार शिवाजी महाराजांचा अश्वरुढ पुतळा

राज्यातील सर्व अंगणवाड्या या एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत चालविल्या जातात. यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील अंगणवाड्यांसाठी दोन स्वतंत्र प्रकल्प निर्माण केलेले आहेत. यामध्ये ग्रामीण आणि शहरी एकात्मिक बाल विकास प्रकल्पांचा समावेश आहे. ग्रामीण भागातून शहरी भागात वर्ग झालेल्या अंगणवाड्या या शहरी भागात वर्ग होणे बाकी राहिले होते. यासाठी नागरी प्रकल्पांची पुनर्रचना करणे आवश्‍यक होते. राज्य सरकारने ती पुनर्रचना आता केली आहे.

पुणे जिल्ह्यातील बारामती, हवेली, खेड, मुळशी आणि मावळ या पाच तालुक्यांमधील ग्रामीण क्षेत्रातील एकूण २८५ अंगणवाड्यांचे शहरी नागरी संस्थांमध्ये समायोजन करण्यात आले आहे. यानुसार बारामती पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील ३७ अंगणवाड्या या आता बारामती नगरपालिका कार्यक्षेत्रात समाविष्ट झाल्या आहेत. हवेली तालुक्यातील १९९ आणि मुळशी तालुक्यातील १३ अशा एकूण २१२ अंगणवाड्या पुणे महापालिका हद्दीत वर्ग झाल्या असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे. बी. गिरासे यांनी सांगितले.

Anganwadi school
देशभरात पाच हजार दलित महिला उद्योजक निर्माण करणार - मिलिंद कांबळे

वर्ग झालेल्या क्षेत्रनिहाय अंगणवाड्या

  • पुणे महापालिका --- २१२

  • पिंपरी चिंचवड महापालिका --- १२

  • बारामती नगरपालिका --- ३७

  • चाकण व राजगुरुनगर नगरपालिका --- २४

  • शहरी भागात वर्ग झालेल्या एकूण अंगणवाड्या --- २८५

ग्रामीण भागातील अंगणवाड्यांची संक्षिप्त माहिती

  • पुणे जिल्ह्यातील एकूण अंगणवाड्या --- ४६७७

  • एकूणपैकी मिनी अंगणवाड्या --- ५२९

  • शहरी भागात वर्ग झालेल्या --- २८५

  • आता ग्रामीणमध्ये शिल्लक राहिलेल्या अंगणवाड्या --- ४३९२

राज्य सरकारने नागरी भागातील एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पांची पुनर्रचना केली आहे. या पुनर्चनेबरोबरच सध्या ग्रामीण एकात्मिक बाल विकास प्रकल्पात असलेल्या परंतु हे प्रकल्पच शहरात वर्ग झाल्यानंतरही ग्रामीण भागात तशाच राहिलेल्या अंगणवाड्यांचे नागरी क्षेत्रात समायोजन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील २८५ अंगणवाड्या आता नागरी प्रकल्पाकडे वर्ग होणार आहेत. याची प्रक्रिया तत्काळ सुर केली आहे.

- जे. बी. गिरासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मबाक), पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com