21 वे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन अत्रेंच्या जन्मगावी

श्रीकृष्ण नेवसे
रविवार, 12 ऑगस्ट 2018

साहित्यसम्राट आचार्य पल्हाद केशव अत्रे यांच्या 120 व्या जयंतीनिमित्त सासवड (ता. पुरंदर) या त्यांच्या जन्मगावी 21 वे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन दोन दिवसीय होत आहे. 13 व 14 आॅगस्ट रोजीच्या या संमेलनात उद्घाटनानंतर कवीसंमेलन, परिसंवाद, प्रकट मुलाखत, बाल आनंद मेळा, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल दिसणार आहे. त्यादृष्टीने संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. 

सासवड- साहित्यसम्राट आचार्य पल्हाद केशव अत्रे यांच्या 120 व्या जयंतीनिमित्त सासवड (ता. पुरंदर) या त्यांच्या जन्मगावी 21 वे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन दोन दिवसीय होत आहे. 13 व 14 आॅगस्ट रोजीच्या या संमेलनात उद्घाटनानंतर कवीसंमेलन, परिसंवाद, प्रकट मुलाखत, बाल आनंद मेळा, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल दिसणार आहे. त्यादृष्टीने संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. 

हे साहित्य संमेलन येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवड शाखेच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. विशेष म्हणजे संमेलन चांगल्या पध्दतीने पार पाडले जात असल्याने.. मागील वर्षी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई यांनी दखल घेत काही अंशी अनुदान दिले होते. यंदा सासवड नगरपालिका मुख्य प्रयोजक असून बाकी काही कार्यक्रमांनाही प्रायोजक आहेत. अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते व शाखेचे अध्यक्ष रावसाहेब पवार यांनी ही माहिती आज दिली. 

ता. 13 रोजी दुपारी साडेतीन वाजता अत्रेंचा जन्मदिन असल्याने त्यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार घालून संमेलनास सुरवात होईल. सासवडच्या आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात खासदार वंदना चव्हाण यांचे हस्ते संमेलनाचे उदघाटन होईल. तर ज्येष्ठ लेखिका डाॅ. अश्विनी धोंगडे या संमेलनाच्या अध्यक्ष असून सोलापूरच्या युवा नेत्या रश्मी बागल कोलते स्वागताध्यक्ष आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासह आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप, प्रदिप गारटकर, सभापती अतुल म्हस्के, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, दिलीप बराटे आदी निमंत्रित आहेत.

उद्घाटनानंतर, ता. 13 या दिवशी सायंकाळी 6 ते 9  या वेळात कविसंमेलन रंगेल. बिल्डर शिरीष जाधव व युवा नेते सागर भुमकर हे उदघाटक आहेत. तर कवी दशरथ यादव अध्यक्ष असून सूत्रसंचालन अस्मिता जोगदंड करणार आहेत. संमेलनात कवी हनुमंत चांदुडे, रविंद्र पाटील, अभिषेक अवचार, अलका तालनकर, दास पाटील, स्वाती बंगाळे, राजेंद्र सोनवणे, शशिकांत गरुड, रमेश रेडेकर, सुधाकर टिळेकर, अनिल कदम, विजया टाळकुटे, जयनब देसले, स्वाती कटके आदी कवी सहभागी होतील. कै. सोपानराव लांडगे यांच्या स्मरणार्थ काव्य पुरस्कार यात प्रदान केला जाईल. ता. 14 रोजी सकाळी साडेदहाला `आचार्य अत्रे यांचे मराठी नाटक व काव्य क्षेत्रातील योगदान` विषयावर परिसंवाद आहे. रविंद्र पोमण यास पाहुणे असतील. तर, प्रा. डाॅ. वर्षा तोडमल, डाॅ. सीमा गोसावी, डाॅ. आनंद गांगुर्डे हे भाग घेतील. दुपारी 12 वाजता `राजकारणातील नवी पिढी` विषयावर प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम होईल. त्याचे उदघाटक नगरसेवक प्रकाश कदम आहेत.

Web Title: 21th Acharya Atre Marathi Sahitya Sammelan at Atres birth place