22 सिंधी बांधवांना अखेर मिळाली भारतीयत्वाची ओळख 

pune
pune
Updated on

पुणे : हजार किलोमिटरचा प्रवास करून पुण्यात आलेल्या सिंधी बांधवांना अखेर भारताने आपले म्हणून स्विकारले आहे. त्यांच्यातील 22 जणांना भारतीयत्व प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे ते आता आपण भारतीय असल्याचे अभिमानाने सांगु शकणार आहेत. यापुर्वी सिंध यापूर्वी 120 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले होते.

सिंधी समाजातील 22 जण पाकिस्तानातील सिंध प्रांतातून पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात स्थायिक झाले होते.  त्यांना आज  जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात भारतीय नागरिकत्व देण्यात आले. सिंधी समाजातील संत युधिष्ठिर लालजी, नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा, डब्बू आसवानी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, तहसीलदार हेमंत निकम, 'मेरे अपने' संघटनेचे बाळासाहेब रुणवाल आणि सिंधी समाज बांधव या वेळी उपस्थित होते. 

सिंधी समाजाला गेल्या काही वर्षापासून भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी बऱ्याच अडचणी येत होत्या. परंतु 2016 मध्ये याबाबत कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर सिंधी लोकांना भारतीय नागरिकत्व देण्याचे अधिकार पुणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी संघटनेच्या पाठपुराव्यानंतर तातडीने दखल घेत सिंधी समाजातील लोकांना भारतीय नागरिकत्व देण्यात येणाऱ्या अडचणी दूर केल्या. यावेळी सिंधी समाजाने जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

A Pune farmer was brutally attacked over a land dispute using a vehicle, iron rods, and stones.
Pune Metro Delay Under Spotlight: MLA Seeks July Launch for Phase 1
Dagdusheth Ganpati traffic update
Fear Grips Koregaon Mul After Leopard Kills Cow and Sheep
Marathi News Esakal
www.esakal.com